
कणकवली : हळवल - ब्राह्मणवाडी येथील रहिवाशी शैलजा नामदेव मोरे (५५) यांचा मृतदेह घरानजिकच्या विहिरीत आढळून आला. ही घटना सोमवारी रात्री ११ ते मंगळवारी पहाटे ४.४५ वा. सुमारास घडली.
शैलजा मोरे यांची मानसिक स्थिती ठिक नव्हती. त्यांच्यावर मानसोपचार तज्ञांमार्फत उपचार सुरू होते. त्यातूनच त्यांनी हे पाऊल उचलल्याचे पोलिसांनी सांगितले. याबाबतची खबर त्यांचे पती नामदेव मोरे यांनी कणकवली पोलिसांत दिली. सोमवारी रात्री शैलजा या घरात झोपल्या होत्या. मात्र, पहाटेच्या सुमारास त्या दिसून न आल्याने त्यांचा शोध घेतला असता विहिरीत त्यांचा मृतदेह आढळून आला. याप्रकरणी आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास पोलिस हवालदार तांबे करत आहेत.










