कणकवलीत अज्ञाताचा मृतदेह

Edited by: उमेश बुचडे
Published on: December 22, 2023 16:43 PM
views 773  views

कणकवली : कणकवली गड नदीपात्रात अज्ञात व्यक्तीचा मृतदेह सापडला आहे. शुक्रवारी दुपारी 1:30 च्या सुमारास गडनदी जवळ असलेल्या परबवाडी स्मशानभूमी नजीक असलेल्या नदीपात्रात हा मृतदेह सापडला. त्याच्या अंगावर पिवळा टी शर्ट, निळी पॅन्ट असून साधारणता वय 25 ते 30 असल्याचे बोलले जात आहे. त्याच्या गळ्यामध्ये काळा दोरा व ताविज असल्याचे पोलिसांनी सांगितले.  मृतदेह मिळाल्या ठिकाणी तात्काळ कणकवली पोलीस निरीक्षक अमित यादव यांनी भेट दिली. त्यांच्या सोबत उपनिरीक्षक श्री. गाडेकर, अनिल हाडळ, पोलीस हवालदार पांढरे, स्थानिक गुन्हे शाखेचे शेळके, देसाई व जामदार, किरण कदम, सामाजिक कार्यकर्ते बबली राणे, नगरपंचायत कर्मचारी प्रवीण गायकवाड हे उपस्थित होते.

त्यांच्या नातेवाईकांनाबद्दल काही माहिती असल्यास कणकवली पोलीस ठाणे जिल्हा सिंधुदुर्ग येथील संपर्क क्रमांक 023672322033, पोलीस नियंत्रण कक्ष सिंधुदुर्ग कक्ष सिंधुदुर्ग 02362228200 तसेच खालील नमूद अधिकारी व अंमलदार यांचे मोबाईलवर संपर्क साधावा. संदीप भोसले, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा 98234 26703, अमित यादव, पोलीस निरीक्षक कणकवली पोलीस ठाणे 9273926420, रामचंद्र शेळके, पोलीस उपनिरीक्षक, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सिंधुदुर्ग यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.