कणकवली गणपती सान्याजवळ २५ वर्षीय तरुणाचा मृतदेह...!

Edited by:
Published on: August 20, 2023 16:39 PM
views 853  views

कणकवली : गणपती साना या ठिकाणी दुपारी १.30 च्या सुमारास एका २५ वर्षाच्या तरुणाचा मृतदेह सापडला असून, या तरुणाच्या मृत्यू बाबत उलट सुलट चर्चा सुरू झाल्या आहेत. घटनेची माहिती मिळतात कणकवली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अमित यादव यांच्यासह पोलीस घटनास्थळी दाखल झाले.

या तरुणाच्या उजव्या दंडावर नागाचे चीत्र गोंदले आहे. या तरुणाचा मृत्यू नेमका कसा झाला..? हे समजू शकले नसले नाही. दरम्यान, याबाबत पोलिसांनी अधिक माहिती देण्यास नकार दिला असून, सदर तरुणाची ओळख पटवण्याचे काम सुरू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक अमित यादव यांनी दिली.

दरम्यान, या तरुणाच्या गळ्यामध्ये  कापडी फडक्या सदृश्य वस्तू आढळली असून, त्यामुळे याचा तपास कणकवली पोलीस करत आहेत.  या घटनेमुळे पोलीस सतर्क झाले असून, पोलीस उपनिरीक्षक अनिल हाडळ यांच्यासह पोलिस कर्मचाऱ्यांनी व अनेकांनी घटनास्थळी धाव घेतली होती.