घरात मृतदेह ; घटनेबाबत पोलीस अनभिज्ञ

Edited by: ब्युरो
Published on: March 13, 2024 17:45 PM
views 1492  views

सावंतवाडी : शहरातील चितारआळी येथील रहिवासी जेष्ठ सुवर्णकार प्रभाकर मंगेश हळदणकर (८६) हे आज सायंकाळी राहत्या मृतावस्थेत आढळून आले. ते घरी एकटेच राहायचे. उशिरापर्यंत घरातून बाहेर न पडल्याने त्यांच्या कामगारांनी घरात जाऊन पाहिले असता ते मृत अवस्थेत आढळून आले. यावेळी डॉक्टरांना पाचारण केले असता डॉक्टरांनी ते मृत असल्याचे घोषित केले. त्यांच्या नाकातून रक्तस्त्राव झालेला होता.  त्यामुळे पडून अथवा हृदयरोगाच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाल्याचा अंदाज उपस्थितांनी व्यक्त केला. त्यांचा मुलगा वकील असून मुंबईत असतो. तो दोनच दिवसांपूर्वी येऊन गेला होता. तर त्यांच्या घराचे बांधकाम सुरू असल्याने ते जून्या घरी राहत होते. दरम्यान उशिरापर्यंत पोलीस घटनास्थळी दाखल झाले नव्हते. तसेच पोलीस ठाण्यात या प्रकाराची कोणतीही नोंद झाली नसल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली.