'त्यां'ना श्रद्धांजली वाहण्यासाठी भजन डबलबारी

Edited by: स्वप्नील वरवडेकर
Published on: October 08, 2025 20:20 PM
views 31  views

कणकवली : सर्वपित्री अमावस्या दिवशी गडनदीपुलावर झालेल्या अपघाती दुर्घटनेत मृत्युमुखी पडेलल्यांना आदरांजली वाहण्यासाठी सुदर्शन मित्रमंडळातर्फे शनिवार ११ ऑक्टोबर रोजी रात्री ९ वा. तेलीआळी येथील डी. पी. रोडसमोर डबलबारीचा सामना आयोजित करण्यात आला आहे. लिंगेश्वर प्रा. भजन मंडळ घोटगे-भरणी, कुडाळचे बुवा विनोद चव्हाण विरुद्ध श्री भुतेश्वर प्रा. भजन मंडळ, खुडी देवगडचे बुवा संतोष जोईल यांच्यात हा डबलबारी सामना होणार आहे. चव्हाण यांना तुषार लोट, शिवराज पोईपकर, जोईल यांना अक्षय मेस्त्री, मांगिरीश घाडी संगीतसाथ देणार आहेत. भजनप्रेमींनी डबलबारीचा सामना पाहण्यासाठी उपस्थित रहावे, असे आवाहन सुदर्शन मित्रमंडळातर्फे करण्यात आले आहे.