दत्तमाऊली दशावतार नाट्य मंडळाची बाजी !

Edited by: ब्युरो
Published on: October 07, 2023 11:57 AM
views 411  views

सिंधुदुर्ग : दत्तमाऊली दशावतार नाट्य मंडळ, सिंधुदुर्गच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेलाय. 6 ऑक्टोबर 2023 गट कार्यालय चिपळूण येथे कामगार कल्याण केंद्र चिपळूण यांच्या अंतर्गत झालेल्या भजन स्पर्धेत या मंडळाने बाजी मारलीय. 

दत्तमाऊली दशावतार नाट्य मंडळाला द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले. तसेच बुवा संकेत कुडव यांना उत्कृष्ट हार्मोनियम वादक म्हणून प्रथम क्रमांक तसेच उत्कृष्ट गायक म्हणून प्रथम क्रमांक मिळाला आहे. तसेच, निखिल निकम यांना उत्कृष्ट पखवाज वादक म्हणून प्रथम क्रमांक मिळाला आणि दत्तमाऊली मंडळाला उकृष्ट कोरस म्हणून प्रथम क्रमांक मिळाला आहे.