माणगावातल्या सौर दत्त यागाला प्रारंभ !

Edited by: भरत केसरकर
Published on: February 22, 2024 14:30 PM
views 82  views

कुडाळ : माणगाव येथील श्री दत्त मंदिर येथे शुक्रवारपासून सौरदत्तयागाला  प्रारंभ होणार आहे. शुक्रवार दिनांक २३ फेब्रुवारी ते सोमवार दिनांक २६ फेब्रुवारी पर्यंत श्री सौर दत्तयागाचे आयोजन केले आहे. हजारो भाविकांच्या उपस्थितीत हा सौरदत्तयाग होत असून या सौरदत्तयागाचा  याची देही याची डोळा आनंद घेण्यासाठी शुक्रवारपासून सोमवार पर्यंत चार दिवस माणगाव येथील श्री दत्तनगरी फुलून जाणार आहे.त्यानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न होणार आहेत तरी भाविकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.     

 माणगाव दत्त मंदिर येथे' श्री सौरदत्त याग 'निमित्त शुक्रवार २३फेब्रुवारी सकाळी ७-०० वाजले पासून अखंड नामस्मरण दुपारी आरती तीर्थप्रसाद महाप्रसाद सायंकाळी ६-४५ वाजता श्रींचा पालखी सोहळा शनिवार २४ फेब्रुवारी रोजी सकाळी ७-०० वाजता नामस्मरण समाप्ती ग्रामदेवता व श्रींचे जन्मस्थान व पु नांदेडकर महाराज स्वामी समाधी स्थानावर अभिषेक पूजा पुन्याहवाचन ,यज्ञ मंडप देवता स्थापना, ग्रह, वास्तू ,हवनादी धार्मिक विधी प्रारंभ दुपारी आरती, तीर्थप्रसाद व महाप्रसाद दुपारी ३-०० वाजता गुहेवर श्री सत्यदत्त पूजा तीर्थप्रसाद दुपारी तीन ते पाच वाजेपर्यंत, दुपारी १-०० वाजता जगदंब संगीत विद्यालय गोठोस रुपेश पवार व सहकारी यांचा तबला पकवाज व सोलोवादन, दुपारी २-०० वाजता श्री मंदार भिडे श्री ओमकार देवसकर व सहकारी मुंबई यांचा गीत रामायण कार्यक्रम, ४-०० वाजता गौरव महाराष्ट्र फेम श्री गणेश मेस्त्री नेरूर यांचा गायनाचा कार्यक्रम ६-३० वाजता आरती पालखी सोहळा रात्री ९-०० वाजता ह. भ .प. भास्कर बुवा इंदूरकर नागपूर यांचे श्राव्य कीर्तन रविवार २५ फेब्रुवारी रोजी सकाळी नैमित्तिक पूजा विधि, श्री सौरदत्त याग जपहवन दुपारी आरती तीर्थप्रसाद व महाप्रसाद दुपारी १-०० वाजता कला संगम मंच शिवाजी इंग्लिश स्कूल व दादासाहेब तिरोडकर कनिष्ठ महाविद्यालय पणदुर यांचा भजनाचा कार्यक्रम, दुपारी २-०० वाजता योगेश बोरचाटे व सहकारी यांचा गायनाचा कार्यक्रम दुपारी ३-०० वाजता श्रीवा. स .विद्यालय ,माणगाव यांच्या गायनाचा कार्यक्रम ४-००वाजता पंडित रघुनाथ फडके यांच्या गायनाचा कार्यक्रम ६-३० वाजता आरती त्यानंतर श्रींचा पालखी सोहळा रात्री ९-०० वाजता ह. भ. प .भास्कर बुवा इंदुरकर नागपूर यांचे सृस्राव्य कीर्तन, सोमवार २६ फेब्रुवारी रोजी श्री दत्त मंदिर मध्ये सकाळी ८-०० वाजले पासून अभिषेक महापूजा श्री सौरदत्त याग बलिदान, पूर्णाहुती, महानैवेद्य आरती मंत्रपुष्प दुपारी आरती तीर्थप्रसाद व महाप्रसाद दुपारी १-०० वाजता श्री द्विसाहस्त्री गुरुचरित्र व पंचपदी निर्मितीवर डॉ. त्रिवेणी थिटे माणगाव यांचे प्रवचन. त्यानंतर श्री सद्गुरु कृपा भजन मंडळ माणगाव श्री प्रकाश तामांणेकर व सहकारी यांचे भजन , कार्यक्रम दुपारी २-३० दामोदर मांजरेकर व सहकारी यांच्या गायनाचा कार्यक्रम ४-००वाजता श्री सिद्धेश कुंटे, श्री नीरज भोसले ,सिद्धेश सावंत यांचा ताल संध्या तबलासहवादन ,संवादिनी मंगेश मेस्त्री ५-००वाजता नेमळे हायस्कूलचे बहारदार गोप नृत्य सादर करते श्री नितीन धामापूर्कर व विद्यार्थी ६:४५ वाजता आरती, श्रींचा पालखी सोहळा रात्री ९-००वाजता ह .भ. प. श्री भास्कर व इंदुरकर नागपूर यांचे स्रूश्राव्य कीर्तन आदि कार्यक्रम होणार आहे.

तरी सर्व भाविकांनी उपस्थित राहून तीर्थप्रसाद ,महाप्रसाद व दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री दत्त मंदिर विश्वस्त मंडळातर्फे करण्यात आले आहे.