
वैभववाडी : करूळ येथे श्री दत्त जयंती उत्सव गुरुवार दि. 4 डिसेंबर रोजी उत्साहात संपन्न होणार आहे. यानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी आरोग्य शिबिराने कार्यक्रमाची सुरुवात होणार असून डॉ. प्रशांत कोलते व डॉ. दर्शना कोलते उपस्थित राहणार आहेत.
दुपारी 4 वाजता हरिनाम, सायंकाळी 6 वाजता दत्त जन्मोत्सव, 6:30 वा. दर्शन व तीर्थप्रसाद होणार आहे. रात्री 9 वाजता पालखी मिरवणूक, तर रात्री 10 वाजता मान्यवरांचा सत्कार होईल. रात्री 11 वाजता मुलांचा विविध गुणदर्शन कार्यक्रम आयोजित केला आहे.
शुक्रवार दि. 5 डिसेंबर रोजी दुपारी 1 वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून सागर चंद्रकांत पवार यांच्यावतीने महाप्रसाद दिला जाणार आहे. तसेच रात्री 9.30 वाजता स्थानिक भजन कार्यक्रम होणार आहे.
या दत्त जयंती उत्सवाला परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन श्री दत्त देवस्थान मंडळ व गावठाण यांच्या वतीने करण्यात आले आहे.










