दत्ता दळवी यांच्यावरील कारवाई राजकीय आकसापोटी : संदीप सरवणकर

Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: November 29, 2023 14:39 PM
views 361  views

वैभववाडी : विविध प्रकारचे अमिषे दाखवून व अन्य दबाब टाकूनही शिंदे गटात प्रवेश न केल्यामुळे मुंबईचे माजी महापौर दत्ता दळवी यांच्यावर कारवाई करण्यात आली.त्यांच्यावरील ही कारवाई राजकीय आकसापोटीची आहे.सत्ताधा-यांच्या या कृत्याला जनता मतपेटीतून योग्य उत्तर देणार आहे असं मत शिवसेना (उबाठा) जिल्हा कार्यकारिणी सदस्य संदीप सरवणकर यांनी व्यक्त केले.

  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधात आक्षेपार्ह विधान केल्याबद्दल श्री दळवी यांना पोलिसांनी अटक केली होती.यानंतर त्यांचे पडसाद भांडूप येथे उमटले. या कारवाई बाबत शिवसेनेचे सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारिणी सदस्य संदीप सरवणकर यांनी सत्ताधाऱ्यांना जबाबदार धरले आहेत.श्री दळवी हे शिवसेनेशी एकनिष्ठ आहेत. त्यांना शिंदे गटात प्रवेश करण्यासाठी अनेक प्रयत्न झाले. परंतू त्यांनी ठाकरेंची साथ सोडली नाही.त्यामुळेच त्यांना त्रास देण्याचा प्रयत्न केला जात आहे. सत्ताधा-यांनी चुकीच्या पद्धतीने कारवाई केली. पोलीसांवर दबाब टाकून कारवाई केली असा आरोप श्री सरवणकर यांनी केला आहे.तसेच सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीकास्त्र सोडले आहे.