कणकवलीत दशावतारी नाट्य महोत्सवाचा शुभारंभ

माजी जि. प. अध्यक्ष गोट्या सावंत, नगराध्यक्ष समीर नलावडे यांचे आयोजन केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या वाढदिवसाचे औचित्य
Edited by: उमेश बुचडे
Published on: April 08, 2023 10:54 AM
views 198  views

कणकवली : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त माजी जि प अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत व समीर नलावडे मित्रमंडळाच्या वतीने आयोजित दशावतारी नाट्य महोत्सवाचा शुभारंभ आमदार नितेश राणे यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत, कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा सौ संजना सावंत, जिल्हा बँक संचालक समीर रमाकांत सावंत, सौ प्रज्ञा ढवण, भाजपा कणकवली तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, संतोष कानडे, भाजपा जिल्हा सरचिटणीस मनोज रावराणे, भाजपा शहराध्यक्ष अण्णा कोदे, कणकवली नगरसेविका सौ मेघा गांगण, सौ कविता राणे, डॉ श्री मिलिंद कुलकर्णी, कलमठ सरपंच संदीप मेस्त्री, वागदे सरपंच संदीप रमाकांत सावंत, आशीये सरपंच महेश गुरव, भाजपा सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष समीर प्रभुगावकर उपस्थित होते. आमदार नितेश राणे यांनी या उपक्रमाबद्दल आयोजकांचे कौतुक केले.