
दापोली : 263 दापोली विधानसभा मतदार संघात आज उमेदवारी अर्ज दाखल करायच्या अखेरच्या वेळेपर्यंत ११ उमेदवारांनी १४ उमेदवारी अर्ज दाखल केले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. अजित थोरबोले यांनी दिली.
शिवसेनेचे विद्यमान आमदार योगेश कदम यांनी २, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार संजय वसंत कदम यांनी २ मनसेचे अबगुल संतोष सोनू यांनी मनसेतून १ व अपक्ष १ असे दोन उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. बहुजन समाज पार्टीचे मर्चंडे प्रवीण सहदेव यांनी १ तर राष्ट्रींय समाज पक्षाचे अनंत पांडुरंग जाधव यांनी १ अर्ज दाखल केला आहे तर अपक्ष उमेदवार खांबे ज्ञानदेव रामचंद्र, खाडे सुनील पांडुरंग, कदम संजय संभाजी, कदम संजय सीताराम, कदम योगेश रामदास व कदम योगेश विठ्ठल या उमेदवारांनी प्रत्येकी १ अर्ज दाखल केला आहे. २४ ऑक्टोबर रोजी २, २८ ऑक्टोबर रोजी ५ तर २९ ऑक्टोबर रोजी ७ अर्ज दाखल झाले आहेत. उद्या ३० ऑक्टोबर रोजी दाखल झालेल्या उमेदवारी अर्जांची छाननी होणार आहे.