दापोलीतील 1 उमेदवारी अर्ज अवैध

Edited by: मनोज पवार
Published on: October 30, 2024 13:40 PM
views 36  views

दापोली : 263 दापोली विधानसभा मतदारसंघातील दाखल करण्यात आलेल्या उमेदवारी अर्जांची आज छाननी करण्यात आली असून केवळ एक अर्ज अवैध ठरला असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. अजित थोरबोले यांनी दिली आहे.

दापोली विधानसभा मतदारसंघासाठी ११ उमेदवारांनी १४ अर्ज दाखल केले होते त्यातील राष्ट्रीय समाज पक्षाचे उमेदवार अनंत पांडुरंग जाधव यांनी दाखल केलेल्या उमेदवारी अर्जात १० सूचक मतदार नसल्याने त्यांचा अर्ज अवैध ठरविण्यात आला आहे. 

आता निवडणुकीच्या रिंगणात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अबगुल संतोष सोनू, शिवसेनेचे कदम योगेश रामदास, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाचे कदम संजय वसंत, बहुजन समाज पार्टीचे मर्चंडे प्रवीण सहदेव, तसेच कदम योगेश रामदास (अपक्ष), कदम योगेश विठ्ठल (अपक्ष), कदम संजय सीताराम (अपक्ष), कदम संजय संभाजी (अपक्ष), खाडे सुनील पांडुरंग (अपक्ष), खांबे ज्ञानदेव रामचंद्र (अपक्ष) हे १० उमेदवार आहेत. दापोली येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयात आज उमेदवारी अर्जांची छाननी करण्यात आली.