
दापोली : तालुक्यातील दापोली येथील रहिवासी डॉ. बारसू गणपत खडसे यांचे २५ सप्टेंबर रोजी वृध्दापकाळाने निधन झाले. डॉ. खडसे हे हाफकीन इन्स्टिट्यूट, मुंबई या संस्थेचे माजी संचालक होतेय त्यांनी मृत्युपश्चात देहदानासाठी इच्छापत्र केलेले होते. डॉ. खडसे यांच्या इच्छेनुसार त्यांची मुलगी सौ. अर्चना दिनेश वराडे व कुटुंबीय यांनी दापोली होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजमध्ये ‘देहदान’ प्रक्रिया पूर्ण करण्याचा निर्णय घेतला. यासाठी डॉ. नरेश पटवर्धन यांनी मार्गदर्शन केले.
डॉ. खडसे यांचा पार्थिव देह दापोली होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजच्या प्राचार्या डॉ. चेतना सुनील गोरीवले यांच्याकडे सुपुर्द केला. यावेळी सुनील गोरीवले, डॉ. मोहन नाले, डॉ. अलिशा वालापकर व कॉलेजचे विद्यार्थी उपस्थित होते. मेडिकल कॉलेजतर्फे खडसे कुटुंबीयांचे आभार मानण्यात आले.










