जुनी इमारत पाडताना नव्या इमारतीच्या दर्शनी भागाचे नुकसान

मालवण बसस्थानकाच्या जुन्या इमारतीचं बांधकाम पाडतानाची घटना
Edited by:
Published on: April 11, 2025 12:05 PM
views 210  views

मालवण : मालवण बसस्थानकाची जुनी इमारत पाडताना नव्या इमारतीच्या दर्शनी भागाचे नुकसान झाल्याच्या घटना घडली आहे. जुनी इमारत पाडण्याचे काम युद्धपातळीवर  सुरु आहेत. गेले तीन दिवस हे काम सुरु आहे. आता शेवटच्या टप्प्यातील काही भाग पाडताना काही भाग हा नवीन इमारतीच्या दर्शनी भागावर पडला त्यामुळे नवीन इमारतीच्या दर्शनी भागाचे नुकसान झाले आहे.