विजेच्या लोळामुळे घरातली उपकरणं जळून खाक

सुदैवाने जीवितहानी टळली
Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: October 14, 2022 20:17 PM
views 556  views

वैभववाडी : वाभवे तांबेवाडी येथील शिवराम तांबे यांच्या घराजवळील माडाच्या झाडावर सायंकाळी वीज पडली. घरातील वीजेची सर्व उपकरणे जळून खाक झाली. ही घटना सायंकाळी ४ च्या दरम्यान घडली.

   तालुक्यात गेले चार दिवस सायंकाळी पाऊस कोसळत आहे. आजही सायंकाळी वीजांच्या गडगडाटासह पाऊस झाला. यावेळी वाभवे तांबेवाडी येथील शिवराम तांबे यांच्या घराशेजारी माडाच्या झाडावर वीज कोसळली.वीजेच्या या लोळामुळे श्री तांबे यांच्या घरातील वीज मीटर सह सर्व वीजेची उपकरणे जळून खाक झाली. सुदैवाने जीवितहानी टळली. या घटनेनंतर तलाठी यांनी येऊन पंचनामा केला.