
देवगड : देवगड येथे वादळीवाऱ्यासह झालेल्या अतिवृष्टीमुळे कुवळे येथील अंकुश तेली यांच्या मांगरावर माडाचे झाड पडून वासे व कौलांचे नुकसान रू ४०००/- हजार नुकसान झाले. चिंचवाड येथील सखाराम तातू चौघुले यांच्या घरावर झाड पडून कौले व कोने फुटल्याने रक्कम रु १३ हजार/- चे नुकसान झाले. गोवळ येथील विष्णु बाबाजी घाडी यांच्या घरा समोरच्या शेड वरील पत्रे उडून सुमारे रुपये २५००/- चे नुकसान तसेच झालेला अतिवृष्टीमुळे मिठबाव येथील शिवदास सत्यवान नरे यांचे राहते घर व गोठ्या वर फणसाचे झाड पडून नुकसान रू.७४,२००/- बुरंबावडे येथील प्राजक्ता प्रकाश शिंगे याच्या घरावर रिठ्याचे झाड पडून अंदाजे नुकसान रक्कम रुपये १८ हजार चे नुकसान झाले आजपर्यंत देवगड तालुक्यात एकूण २२९८ मी मी पावसाची नोंद तहसील देवगड येथे करण्यात आली होती.