प्रकाश मोर्ये पॅनेलला दादा बेळणेकरांच्या पॅनेलचा जोरदार धक्का

बाराच्या बारा जागांवर विजय
Edited by: भरत केसरकर
Published on: October 28, 2023 20:22 PM
views 630  views

 कुडाळ : सर्वोदय पतसंस्थेचे विद्यमान चेअरमन प्रकाश मोर्ये पॅनलला दादा बेळणेकरच्या पॅनलला जोरदार धक्का दिला आहे. बाराच्या बारा जागावर विजय मिळवत  जोरदार मुसंडी मारली आहे.  या विजयाने प्रकाश मोर्ये यांचे सहकारातील अस्तित्वाला माणगाव खोऱ्यातून जोरदार धक्का बसल्याचे चित्र आजच्या निकालाने पाहायला मिळाले आहे.

   आजच्या निकालात प्रकाश मोर्ये यांना सहकार क्षेत्रात माणगाव खोरात एक धक्का मानला जातो. भाजपच्या दुसऱ्या गटांने प्रकाश मोर्ये गटावर मात करत धक्का दिल्याने पुन्हा एकदा भाजप मधील ह्या धक्क्यातून प्रकाश मोर्ये कसे सावरतात हे पाहणे औत्सुक्याच ठरणार आहे. बाराच्या बारा जागावर दादा बेळणेकर पॅनलने विजय मिळवत पाच वर्ष अध्यक्ष असलेल्या प्रकाश मोर्ये यांनाही पराभवाची धूळ चारली आहे.या निकालाकडे संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्याचे लक्ष लागून राहिला होता.दादा बेळणेकर पॅनल कडून प्रकाश मोर्ये पॅनल कडून लढणाऱ्या माजी पंचायत समिती सदस्य मथुरा राऊळ यांचाही धक्कादाय पराभव झाला आहे.


दादा बेळणेकर पॅनलचे विजयी उमेदवार 

दादा बेळणेकर-589

सगुण धुरी-564

सुभाष भिसे-546

समिर दळवी- 553

प्रकाश म्हाडगुत-524

दिलीप माळकर-551

महादेव गावडे-547

विनोद जाधव-561

मंजुषा मधुकर परब(महिला)

वैशाली रावजी प्रभू (महिला)

मदन कृष्णा गोसावी(एनटी)

जनार्दन मुकुंद कदम(ओबीसी)


बाद-114


प्रकाश मोर्ये पॅनलचे पराभूत उमेदवार 

प्रकाश मोर्ये-509

जोसेफ डॉन्टस-458

मुकुंद धुरी-408

महादेव परब-427

पंढरीनाथ परब-458

संदेश राणे-475

उत्तम सराफदार-438

प्रफुल्ल सुद्रिक-385

कविता कुडतरकर(महिला)

मथुरा राऊळ(महिला)

रामचंद्र धोंडी खरात(एनटी)

गुरुप्रसाद कोरगावकर (ओबीसी)