डी. एड बेरोजगारांच्या उपोषणाला विशाल परब यांची भेट

यशस्वी चर्चा घडवून आणू ; उपोषण मागे घ्या | विशाल परब
Edited by: भरत केसरकर
Published on: April 05, 2023 14:46 PM
views 1180  views

सिंधुदुर्ग : विशाल सेवा फाउंडेशनचे अध्यक्ष तथा भाजपचे युवा नेते विशाल परब यांनी डी.एड बेरोजगारांच्या उपोषणाला भेट देत हा प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले. स्थानिक पातळीवर शिक्षक भरती करण्यासंदर्भात आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नारायण राणे, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याशी माजी खासदार निलेश राणे व आमदार नितेश राणे यांच्या माध्यमातून भेट घडवून आणून देवू आणि यशस्वी चर्चा करू. तसेच योग्य तो मार्ग काढून शिक्षक भरती होण्यासंदर्भात चर्चा केली जाईल. आपण उपोषण मागे घ्या, अशी विनंती विशाल परब यांनी उपोषणग्रस्तांना केली.


यावेळी त्यांच्यासोबत भाजपचे ओरोस मंडल अध्यक्ष दादा साईल उपस्थित होते. त्यावेळी डीएड बेरोजगारांच्या वतीने डीएड संघर्ष समितीचे जिल्हाध्यक्ष विजय फाले यांनी विशाल परब यांना या उपोषणास भेट देवून पाठींबा दिल्याबद्दल धन्यवाद दिले.