डी. फार्मसी प्रवेशाची अंतिम संधी भोसले फार्मसी कॉलेजमध्ये २७ ते ३० डिसेंबर अगेन्स्ट कॅप प्रवेश

Edited by: विनायक गांवस
Published on: December 26, 2022 16:19 PM
views 581  views

सावंतवाडी : तंत्रशिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्यातर्फे सुरु असलेली डी. फार्मसी  प्रवेश प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली असून केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेच्या तीनही फेऱ्या पूर्ण झालेले आहेत. यानंतरची फेरी ही अगेन्स्ट कॅप पद्धतीची राहणार असून तीनही फेऱ्यानंतर रिक्त राहिलेल्या जागा या पद्धतीनुसार  भरल्या जातील.

यशवंतराव भोसले डी. फार्मसी कॉलेजमध्ये २७ ते ३० डिसेंबर या कालावधीत इच्छुक विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादी तयार करून ही प्रवेश प्रक्रिया राबवली जाईल. यासाठी विद्यार्थ्यांनी संस्था प्रवेशाचा विहित नमुन्यातील अर्ज योग्य कागदपत्रांसहित संस्थेमध्ये जमा करावा. विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता यादीनुसार त्यांचे प्रवेश लगेचच पूर्ण केले जातील.

तरी कॅप राऊंडमध्ये प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांनी या अंतिम फेरीचा फायदा घ्यावा व आपला प्रवेश सुनिश्चित करावा, असे आवाहन यशवंतराव भोसले डी. फार्मसी कॉलेजचे प्राचार्य सत्यजित साठे यांनी केले आहे.