श्री सरस्वती इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, तोंडवली मध्ये डी. फार्मसी व बी. फार्मसी प्रवेशाची सुवर्णसंधी !

पहिल्या तीन फेऱ्यांमधूनही प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठी प्रवेशाची एक अंतिम सुवर्णसंधी !
Edited by: उमेश बुचडे
Published on: December 27, 2022 10:23 AM
views 589  views

कणकवली : तंत्र शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र मार्फत राबवण्यात येणारी डी. फार्मसी प्रवेश प्रक्रिया आता शेवटच्या टप्प्यात आली आहे तर बी. फार्मसी प्रवेश प्रक्रिया 10 जानेवारी पर्यंत चालणार आहे. डी. फार्म. केंद्रीभूत प्रवेशाच्या तीन फेऱ्या पार पडल्या असून आता शेवटची फेरी ही अगेंस्ट कॅप प्रवेश फेरी म्हणून घेतली जाणार आहे. पहिल्या तीन फेऱ्यांमधूनही प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठी ही फेरी म्हणजे प्रवेशाची एक अंतिम सुवर्ण संधी राहील.

श्री सरस्वती इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, तोंडवली या नामांकित महाविद्यालयातर्फे या अखेरच्या फेरीचे आयोजन दि. 27 डिसेंबर ते 30 डिसेंबर या दरम्यान करण्यात आले आहे. डी. फार्मसी प्रवेशासाठी इच्छुक विद्यार्थ्यांची पात्रता तपासून गुणवत्ता यादी प्रदर्शित केली जाईल व त्यानुसार प्रवेश दिला जाईल.

आवश्यक कागदपत्रांसह विद्यार्थ्यांनी संस्थेस भेट द्यावी. तरी सर्व पात्र व मागील तीनही फेऱ्यांत डी.फार्म. साठी प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांनी या शेवटच्या अनमोल संधीचा लाभ घेऊन आपला प्रवेश निश्चित करावा व सुसज्ज प्रयोगशाळा,अनुभवी प्राध्यापक वर्ग, दर्जेदार शिक्षण या वैशिष्ट्यांनी परिपूर्ण अश्या तोंडवली फार्मसी महाविद्यालयातील सुविधांचा फायदा घ्यावा. तसेच आता सुरू असलेल्या बी.फार्मसी केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेची अंतिम तारीख 10 जानेवारी असल्याने प्रवेश संधीचे आवाहन संस्थेचे अध्यक्ष वसंत सावंत यांनी केले आहे.