
कणकवली : मालवणवरून कोल्हापूरच्या दिशेने जाणारी क्रुझर हि 17 सीटर गाडी पलटी होऊन अपघात झाला. यामध्ये काही जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना कणकवली उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. स्थानिकांनी मदत कार्य करत जखमींना रुग्णालयात दाखल केले. ही घटना शुक्रवारी सायंकाळी ७ च्या सुमारास हळवल फाटा येथे घडली. नेमका अपघात कसा झाला हे माहिती नसले तरी चालकाचे गाडीवरून नियंत्रण सुटल्याने ही घटना घडल्याचे बोलले जात आहे.