
सावंतवाडी : सावंतवाडी शहरातील ऐतिहासिक मोती तलावात निदर्शनास येत असलेल्या मगरीला पकडण्यासाठी वनविभागाने 'सापळा ' लावला होता. मात्र, यात वनविभागाला यश आले नाही. रविवारी तब्बल चार तास ही मगर त्याच संगीत कारंजावर येऊन बसली. मात्र, चार तासांत वनविभागाची टीम घटनास्थळी न पोहोचल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली
नागरिकांच्या भीतीचा विषय ठरलेली ही मगर वनविभागाकडून लावण्यात आलेल्या सापळ्यात अडकेल अस वाटल होत. मात्र, त्यात वनविभागाला यश आल नाही. आज रविवार दुपारी १२ पासून ४ वाजेपर्यंत ही मगरीन पुन्हा त्याच कारंजावर येऊन बसली होती. या दरम्यान वनविभागाची टीम तिथे न फिरवल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. आज पाच दिवसांचा गणपतीच विसर्जन होणार असून यामुळे धोका निर्माण झाला आहे. वनविभागाकडून दिरंगाई होत असल्याने तीव्र नाराजी स्थानिकांनी व्यक्त केली आहे.










