कौटुंबिक कलह ; विवाहितेला मारहाण

विवाहितेची पोलिसात धाव..!
Edited by: निलेश ओरोसकर
Published on: October 30, 2025 11:03 AM
views 326  views

कुडाळ : आपला पती, सासू,सासरे व दीर या चौघांनी शिवीगाळ करून हाताने व काठीने मारहाण केल्याची फिर्याद हिर्लोक राणेवाडी येथील सविता वैभव बरगडे ( ३५ ) यांनी मंगळवारी कुडाळ पोलीस ठाण्यात दिली. ही घटना रविवारी रात्री 8.30 वाजण्याच्या सुमारास घडली.याप्रकरणी पती वैभव पांडुरंग बरगडे , सासू प्रतिज्ञा पांडुरंग बरगडे, सासरा पांडुरंग बरगडे  व दीर प्रकाश पांडुरंग बरगडे या चार जणांविरुद्ध  कुडाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.      

सविता यांचे पती  वैभव बरगडे कुडाळ येथे राहतात.  सासू सासरे, नवरा  व दीर काही कारण नसताना वारंवार सविता यांच्याशी  भांडण करून त्यांना मारहाण करतात. याबाबत सविता यांनी आपल्या माहेरी कळविले होते. त्यावरून त्यांच्या  माहेरकडील लोकांनी त्याचे सासु, सासरे, दिर व पती यांना विचारणा केली होती. तेव्हा त्यांनी वारंवार सविता यांची माफी मागितली होती.

रविवारी  26 ऑक्टोबर रोजी सकाळी 7.30 वाजण्याच्या सुमारास पती वैभव  कामावरुन घरी आले. त्यावेळी सविता या केर - दोडामार्ग येथे माहेर जायच्या असल्याने घरातील  कामे आवरत होत्या. त्यानंतर कामे आटोपून त्या माहेरी जायल्या निघल्या असताना त्याचे पती वैभव याने पत्नी सविता यांना तू  कोठेही जायचे नाही, तु माझ्या आईला कोणतेही काम सांगायचे नाही, तु स्वतः बसुन खायचे नाही,असे बोलून त्यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. दुपारी  2.30 वाजण्याच्या सुमारास काहीही कारण नसताना वैभव याने सविता यांना शिवीगाळी करून काठीने मारण्यास सुरवात केली. त्यांनतर रात्री 8.30 वाजताच्या सुमारास वैभव याने काहीही कारण नसताना पुन्हा त्यांना शिवीगाळ करुन गळ्यातील मंगळसुत्र काढून दे, असे वारवार सांगण्यास सुरुवात केली त्यांनतर त्याने मंगळसुत्र तोडुन टाकले.

सविता याची  सासू प्रतिज्ञा,सासरे पांडुरंग व पती वैभव याने  सविता यांच्या साडीला धरुन ओढत घराचे बाहेर नेले. त्यांच्या सासु-सासन्यांनी व पतीने   शिवीगाळ करुन हाताच्या बुक्क्याने व काठीने मारण्यास सुरुवात केली. त्यावेळी सविता यांचा दिर प्रकाश हा तेथे आला आणि त्याने शिवीगाळ करुन सविता यांच्या कानाखाली मारली. तो त्यांना मारण्यासाठी वारंवार त्यांच्या अंगावर धावुन जात होता. सासरे पांडुरंग यांनी सविता यांना  धक्का देवुन खाली पाडले. सविता यांनी आपल्या घरात जाण्यास नकार दिला असता, सासू, सासरे व पतीने त्यांना धरून  घरात गेले. याप्रकरणी पती वैभव याच्यासह चार जणांविरुद्ध पोलिसांनी भारतीय न्याय सहिता 118, (1), 115 (2), 352, 324 (2) प्रमाणे गुन्हा दाखल केला. याबाबतचा तपास आवळेगाव पोलीस आवळेगाव पोलीस दूरक्षेत्राचे हवालदार समीर कोचरेकर करीत आहेत.