फ्लॅटच्या भाड्याचा वाद विकोपाला गेला

तरुणाला मारहाण करून नदीत फेकला
Edited by: मेगनाथ सारंग
Published on: October 17, 2025 14:37 PM
views 681  views

कुडाळ :  फ्लॅटच्या भाड्याच्या कारणावरून कुडाळ तालुक्यातील माड्याचीवाडी मधलीवाडी येथील सिद्धेश प्रमोद गावडे (२२) या युवकाला कारमध्ये बसवून माड्याचीवाडी करमळगाळू येवून गोवेरीमार्गे खानोली येथील जंगलात नेऊन झाडाला बांधून दांड्याने व लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आल्याची घटना मंगळवारी सायंकाळी घडती. या युक्काच्या तोंडात फडका कोवून अमानुषपणे मारहाण करण्यात आली. तो बेशुद्ध पडल्यानंतर त्याला बांदा येथील महामार्गानजीकच्या नदीमध्ये टाकण्यात आले. ही घटना बुधवारी सकाळी उघडकीस आल्यानंतर जिल्हयात खळबळ माजली.

याबाबतची फिर्याद सिद्धेश गावडे याने निवती पोलीस ठाण्यात दिल्ल्त्यानंतर संशयित किशोर सिंधू वरक (४०, रा. खानोली धनगरवाडी) याच्यासह झोरे व गवस (पूर्ण नाव माहित नाही.) अशा तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निवती पोलीस ठाण्यात सिद्धेश गावडे याने दिलेल्या फिर्यादीनुसार, संशयित किशोर बरक हा सिद्धेश गावडे याच्या कुडाळ येथील फ्लॅटचे अकरा महिन्यांचे माडे देणे होता. त्या फ्लॅटमधील वेरक याचे सामान सिद्धेशकडे होते. तू मात्रो सामान आणून दे. मी तुझी भाड्याची अर्थी रक्कम देतो, असे वरक याने सिद्धेश याला १४ ऑक्टोबर रोजी सांगितले. त्याचदिवशी सायंकाळी साडे चार वाजण्याच्या कुडाळ एमआयडीसी येथील करमळगाळू बांब्यानजीक बोलावून घेतले. तेव्हा सिद्धेश तेथे आला. बरक पांढऱ्या रंगाची इर्टिका कार घेऊन तेथे आला. त्या कारमध्ये त्याच्यासोबत चालक झोरे (पूर्ण नाय माहित नाही.) व गवस (पूर्ण नाव माहित नाही.) अशा दोन अनोळखी व्यक्ती होत्या. वरक याने त्या अनोळखी व्यक्तींच्या सहाय्याने सिद्धेश याला त्या कारमध्ये बसविले.

खानोलीच्या जंगलात घेऊन गेले 

ती कार करमळगाळू-गोवेरीमार्गे खानोली येथे नेत असताना प्रथम त्या कारमध्ये गोवेरीच्या आसपास सिद्धेश याला मारहाण करून त्याच्याकडील मोबाईल जबरदस्तीने हिसकावून घेतला. नंतर खानोली येथे वरक याच्या घराजवळ एका आडोशाला जंगलात सिद्धेश याला घेऊन गेले. झोरे व गवस या दोघांनी त्याला कारमधून खाली उतरवून, तुला कसले पैसे पाहिजेत?, असे बोलून त्या दोघांनीही त्याला शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच त्याला' तेथील झाडाजवळ नेऊन त्याचे हातपाय दोरीने बांधून त्याला झाडाला बांधले.

याचा आवाज कायमचा बंद करूया ! 

सिद्धेश मोठमोठ्याने ओरडू लागला, तेव्हा वरक तेथे आला आणि त्याने याचा आवाज कायमचा बंद करूया, असे बोलून सिद्धेशच्या तोंडात फडका कोंबून त्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तोंड बांधलेल्या त्या झोरे व गवस या दोघांनी हातात दांडे घेऊन सिद्धेश याच्या दोन्ही पायांवर तसेच मांडधांवर मारुन त्याला मारहाण केली. त्यानंतर वरक याने झोरे याच्या हातातील दांडा घेऊन, तुझा विषय आता कायमचा संपवतो, असे बोलून सिद्धेश बाला जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने ती दांडा त्याच्या डोक्याच्या पाठिमागे डाव्या बाजूला जोरात मारून त्याला दुखापत केली.

मयत झाल्याचे समजून नदीमध्ये टाकले

त्यानंतर पुन्हा त्याच्या मानेवर जोरात लाथ मारली. त्यात सिद्धेश बेशुद्ध पडल्याने मयत झाला असावा, असे समजून त्याला नंतर बांदा येथील मुंबई-गोवा महामार्गानजीकच्या असलेल्या नदीमध्ये टाकले. 

तिघांविरोधात गुन्हा दाखल 

दरम्यान, संशयित किशोर वरक याच्यासह झोरे व गवस (पूर्ण नाव माहित नाही.) अशा तीनजणांविरोधात भारतीय न्याय संहिता कलम १०९, ११९ (१), १३७ (२), १२६ (२), ३५२, ३५१ (३). ३ (५) प्रमाणे निवती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्याचा तपास निवती पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक एस. एल. जाधव करीत आहेत.

बुधवारी सकाळी घटना समजली

या मारहाणीनंतर सिद्धेश बुधवारी सकाळी शुद्धीवर आला तेव्हा नदीपात्र परिसरात असल्याचे त्याच्या लक्षात आले. त्याने तेथील ग्रामस्थांना मदतीसाठी हाक दिली. त्याला आपण बांदा येथे असल्याचे समजले. तेथील ग्रामस्थांनी बांदा पोलिसांना याबाबत माहिती दिली. बांदा पोलिसांनी सिद्धेश याला तेथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले. त्यानंतर घटना समजताच सिद्धेशचे नातेवाईक व ग्रामस्थांनी तेथे धाव घेतली. सिद्धेश याच्या मानेला दुखापत झाल्याने नातेवाईकांनी त्याला सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्यानंतर बुधवारी दुपारी त्याला कुडाळ येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले.