
मंडणगड : तालुक्यातील मौजे पिंपळोली येथील मशिदीमधील 2 लाख 47 हजार रुपये किंमतीचे चांदीचे जुने मौल्यवान दागीने अज्ञात चोरट्याने लांबवीले असल्याची तक्रार मंडणगड पोलीस स्थानकात 9 ऑक्टोंबर 2025 रोजी नोंद करण्यात आली आहे. चोरी संदर्भात हुसेन इब्राहीम पेटकर वय 87 व्यवसाय गावाचे काझी राहणार पिंपळोली मुस्लिम मोहल्ला यांनी पोलीस स्थानकात नोंदविलेल्या तक्रारीतील माहीतीनुसार 8 ऑक्टोंबर 2025 रोजी रात्री सव्वा दहा ते 9 ऑक्टोंबर 2025 सकाळी नऊ वाजण्याचे सुमारास मौजे पिंपळोली मशिदीत चोरीची घटना घडली नमुद वेळी व जागेत मशिदीतील जुन्या वापराच्या व मौल्यवान चांदीच्या वस्तु कोणीतरी अज्ञात चोरट्याने मशिदीमधील पाण्याच्या टाकीच्या रुमचे कुलुप कोणत्यातरी हत्याराने तोडून मिशीदीत आत प्रवेश केला व आतील सागवानी बॉक्सला लावलेले कुलुप तोडून रुममधील चांदीचे दागीने लबाडीचे इराद्याने स्वताःहाचे फायद्याकरिता चोरुन नेले.
चोराने एकूण 247000 रुपये इतक्या किंमतीचा मुद्देमाल चोरुन नेला यात 1 लाख 50 हजार रुपये किंमतीचे अंदाजे दीड किलो वजनाचे मशिदीवर लावण्यासाठी वापराचा जुना चांदीचा चॉंद 45 हजार रुपये किंमतीचे 300 ग्रॉम वजनाचे चांदीचे जुने दागीने, 30 हजार रुपये किंमतीचे 200 ग्राम वजानाचे निशाला वर लावायचे जुने चांदिचे गोंड 22 हजार रुपये किंमतीचे 200 ग्राम वजनाचे लहान आकाराचे तीन चांदीचे चॉद तारे चोरीस गेले आहेत. श्री. पेटकर यांनी केलेल्या तक्रारीनंतर अज्ञात चोरट्याचे विरोधात मंडणगड पोलीस स्थानकात गु.र.न. 54/2025 भारतीय न्यायसंहिता अधिनियम 2023 चे कलम 305 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.










