
कुडाळ : झाराप तिठा येथील मोबाईल शॉपीसह जवळ असलेल्या गाळ्यांमध्ये चोरी झाल्याची घटना घडली आहे. यामध्ये सुमारे १० हजार ६०० रुपयांची चोरी झाली आहे. कुडाळ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कुडाळ तालुक्यातील मुंबई - गोवा महामार्गावरील झाराप तिठा येथील वैभव कांदे (मुळ रा. वजराट) यांची मोबाईल शॉपी अज्ञात चोरट्याने फोडली या मोबाईल शॉपी सह जवळ असलेल्या गाळ्यांचे कुलूप फोडून त्यामधील साहित्य चोरीला गेल्याची घटना घडली आहे. यामध्ये सुमारे १० हजार ६०० रुपयांची चोरी झाल्याची तक्रार वैभव कांदे यांनी कुडाळ पोलीस ठाण्यात दिली आहे तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.










