
मंडणगड : चिरेखाण व्यवसाईकांकडून घेतलेले ११ लाख ७० हजार रुपये स्वतःहाकडे घेऊन ते परत न दिल्याने चेतन गुलाबराव कोंडे सध्या राहणार नांदगाव नाते ता. महाड मुळ गाव खेड शिवापूर हवेली पुणे याच्या विरोधात मंडणगड पोलीस स्थानकात २८ सप्टेंबरला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेबाबत धुत्रोली येथील व्यवसाईक अजीम कडवेकर ( वय ४४ ) यांनी पोलीस स्थानकात दिलेल्या फिर्यादीतील माहीतीनुसार घटनेतील आरोपीत याने फिर्यादी यांचेकडून 14 जुलै 2021 ते 21 जुलै 2025 या कालावधीत के. के. मल्हार डेअरीच्या खात्यावर 10 लाख रुपये घेतले होते. तसेच आवश्यक कामाकरिता लागणारे 1 लाख 70 हजार रुपये किमंतीचा जांभा दगडाचे चिरे घेतले होते. आरोपीकडून 11 लाख 70 हजार रुपये येणे असल्याने फिर्यादी यांनी आरोपीकडे रक्कमेची मागणी केली असता, रक्कम आज देतो उद्या देतो असे वांरवार सांगून फसवणुक केली. म्हणून त्याचे विरोधात मंडणगड पोलीस स्थानकात गु.र.नं. 3/2025 भारतीय न्यायसंहिता अधिनियम 2023 चे कलम 31(4) प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याबाबत अधिक तपास सुरु आहे.










