देवगड बीएसएनएल कार्यालयात चोरी

Edited by:
Published on: September 26, 2025 21:00 PM
views 552  views

देवगड : देवगड येथील भारत संचार निगम (BSNL) कार्यालयाच्या मागील दरवाजाचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने आत प्रवेश केला आणि अंदाजे रु. 28,800 किमतीचा मुद्देमाल लंपास केला. फिर्यादी उपविभागीय अधिकारी सुधाकर शिवमुर्ती हिरामणी (५६) यांच्या माहितीनुसार, ही घटना २५ सप्टेंबर सायं. ६ ते २६ सप्टेंबर सकाळी ७ या दरम्यान घडली.

चोरट्याने एलसीसी कार्ड ९६ (रु. १९,२००/-), कंट्रोल कार्ड ३६ (रु. ७,२००/-), पॉवर सप्लाय कार्ड १२ (रु. २,४००/-) असा एकूण रु. २८,८००/- किंमतीचा मुद्देमाल चोरून नेला. याप्रकरणी बीएनएस ३०५, ३३१(३)(४) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस उपनिरीक्षक संतोष भालेराव पुढील तपास करीत आहेत.