
कणकवली : दारिस्ते - गावकरवाडी येथे सामाईक घराच्या वादातून एकाच कुटुंबाच्या दोन गटांमध्ये हाणामारी झाली. ही घटना बुधवारी रात्री १०.३० वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी परस्परविरोधी दिलेल्या तक्रारींनुसार ६ जणांच्याविरोधात कणकवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
दारिस्ते येथील गावकर कुटुंबीयांमध्ये सामाईक घरावरून वाद आहेत. यावरून बुधवारी कुटुंबातील दोन गटांमध्ये हाणामारी झाली. सानिका गावकर यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, आपण पडवीत झोपली असताना अंकिता गावकर हिने माझ्या अंथरूणावर पाणी ओतले. त्यानंतर त्यानंतर संदीप गावकर, शिवदास गावकर, अंकिता गावकर यांनी मला व पती संजय गावकर, जाऊ सुनोलचना गावकर यांना शिवीगाळ करीत लोखंडी रॉडने मारहाण केली.
यात सनिका गावकर या जखमी झाल्या. अंकिता गावकर यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, सानिका गावकरी माझ्या वाटणीच्या खोरी झोपली होती. याबाबत विचारणा केली असता मला संजय गावकर, सानिका गावकर, सुलोचना गावकर तिघांनी संगनमत करून शिवगाळ करीत शिवीगाळ करीत ठार मारण्याची धमकी देत मारहाण केल्याचे म्हटले आहे. दोन्ही गटांनी दिलेल्या एकमेकांच्या विरोधात परस्परविरुद्ध तक्रार दिली आहे. त्यानुसार ६ जणांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला. तपास पोलीस हवालदार वेंगुर्लेकर करीत आहेत.










