
कणकवली : शहरातील प. पू. भालचंद्र महाराज संस्थालगत असलेल्या बाळगोपाळ हनुमान मंदिरातील फंडपेटी अज्ञात चोरट्यांनी फोडली आहे. राविवारी सकाळी चोरीचा प्रकार स्थानिकांच्या निदर्शनास आला.
शहरात काही दिवसांपूर्वी सना कॉम्प्लेक्स येथील सराफी पेढी फोडण्यात आली होती. या चोरीचा तपास अजूनही लागलेला नाही. त्यात बाळ गोपाळ हनुमान मंदिरातील फंडपेटी फोडण्यात आली आहे. फंडपेटीचा कडी कोयंडा तोडून चोरट्यांनी आतील रोकड लंपास केली. त्याचबरोबर कडी कोयंडा तोडण्यासाठी आणलेली काटवणी तेथेच टाकून चोरट्यांनी पलायन केले.