
वैभववाडी : शहरातील एका मोबाईल शाॅपीमध्ये मोबाईल खरेदीचा बहाणा करून तेरा हजाराचा मोबाईल चोरट्यांनी लंपास केला. हा प्रकार आज दुपारी १.३० वा. दरम्यान घडला. अखेर सायंकाळी पोलीसांनी या दोघा चोरट्यांना ताब्यात घेतले आहे. दोनही चोरटे उत्तर प्रदेशमधील आहेत. सध्या ते काही दिवसांपासून वैभववाडी शहरातच राहत आहेत.