सोनवडेत क्रिकेट स्पर्धेचं आ. नाईकांच्या हस्ते उदघाटन

Edited by:
Published on: December 31, 2023 11:32 AM
views 39  views

कुडाळ : एल. सी. एम. युवा प्रतिष्ठान सिंधुदुर्ग यांच्या वतीने सोनवडे येथे भव्य दिव्य ओव्हरआर्म  क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. या स्पर्धेचे उदघाटन आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते आज करण्यात आले. आ. वैभव नाईक यांनी स्पर्धेला शुभेच्छा देत क्रिकेट खेळण्याचा आनंद लुटत फटकेबाजी केली.

यावेळी शिवसेना उपतालुका प्रमुख महेश सावंत, एल. सी. एम. युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष हेमंत चव्हाण, सचिव रुपेश तेलंग, ऋषिकेश तेलंग, दिनेश गुरव, गितेश गुरव, प्रतिक चव्हाण, अमोल चव्हाण, काशीराम घाडी, दिपक घाडी,माजी सरपंच बांदेकर, गुरु मेस्त्री,चंदन ढवळ, तेजस भोगले, भावेश परब, पी. डी. सावंत, सरपंच प्रतीक्षा घाडीगावकर, सिद्धेश घाडी,शरद गुरव, आर. बी. गुरव, लवू घाडी, वामन चव्हाण, राजू सावंत, प्रथमेश परब, अक्षय कासले, अभिषेक सावंत आदी उपस्थित होते.