
सावंतवाडी : शहरातील शिरोडा नाका येथे नारळाचं झाड विद्युत खांबांच्या तराहसह रस्त्यावर कोळसलं. यामुळे सावंतवाडीहून शिरोड्याला जाणारा राज्य महामार्ग ठप्प झाला आहे. ही घटना आज दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास घडली.
शहरातील शिरोडा नाका परिसरात ही घटना घडली. सुदैवाने यात कोणतीही दुर्घटना घडली नाही. रहदारीचा असा हा परिसर आहे. हा प्रकार पहाता शहरात अनेक ठिकाणी लाईनवर झाडांच्या फांद्या आल्या आहेत. यामुळे दुर्घटना घडण्याची शक्यता आहे. महावितरणकडून अशा धोकादायक ठिकाणांवर दक्षता घ्यावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे. तसेच जीर्ण झालेले विद्यूत खांब तात्काळ बदलण्याची मागणी केली आहे.