कोर्टाचा आदेश | अंतीम निकालापर्यंत वीज कनेक्शन तोडू नका !

एसपीके कॉलेजजवळच्या गाळेधारकांना अड. निरवडेकर यांनी मिळवून दिला न्याय
Edited by: विनायक गांवस
Published on: April 05, 2023 11:21 AM
views 235  views

सावंतवाडी : सावंतवाडी एसपीके कॉलेज नजीकच्या गाळेधारकांना महावितरण विभागामार्फत वीज कनेक्शन तोडण्याचे आदेश देण्यात आलेले होते. या आदेशाविरुद्ध गाळेधारकांनी ॲड. अनिल निरवडेकर यांच्या मार्फत न्यायालयात दाद मागितली होती. त्या संबंधित सावंवाडी न्यायालयाने महावितरण विभागाच्या आदेशावर अंतरिम मनाई आदेश पारित करून या प्रकरणाचा अंतिम निकाल लागेपर्यंत कोणत्याही गाळेधारकाचे वीज कनेक्शन खंडित करू नये असा आदेश दिला आहे. सावंतवाडी न्यायालयामार्फत गाळेधारकांना न्याय मिळवून दिल्याबद्दल सर्व गाळेधारकांनी ॲड. निरवडेकर यांचे अभिनंदन करून आभार मानले.