
सावंतवाडी : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक व शैक्षणिक उत्कर्ष युवामंच कोलगाव ता. सावंतवाडी जि. सिंधुदुर्ग आयोजित विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवानिमित्त जिल्हास्तरीय वेशभूषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा खुला गट आणि बालगट अशा दोन गटात सोमवारी १४ एप्रिलला घेण्यात येणार आहेत. विजेत्यांना आकर्षक बक्षीसांनी सन्मानित करण्यात येणार आहे.
- वेशभूषा ऐतिहासिक किंवा सामाजिक विषयास अनुसरून असावी.
- सिंधुदुर्ग जिल्ह्यातील स्पर्धक पात्र असतील
- स्पर्धेसाठी किमान वेळ १ मिनिट तर कमाल वेळ ३ मिनिटे आहेत.
- स्पर्धा खुला गट व बाल गट (०२ वर्ष ते १४ वर्षे) अशा दोन गटात आहेत.
- स्पर्धकांनी नावनोंदणी शनिवार दि. १२ एप्रिल २०२५ रोजी सायंकाळी ०८.००
वाजेपर्यंतच करणे बंधनकारक आहे. - सर्व अधिकार हे आयोजन समितीकडे असल्याने आवश्यकतेनुसार स्पर्धेमध्ये बदल
करण्यात येतील. - आयोजकांचा / परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील.
- नावनोंदणी शुल्क ५०/- रुपये आहे.
- नोंदणी शुल्क ७८२१०३२९१९ या नंबरवर Gpay करून स्क्रीनशॉट याच नंबरवर
पाठवावा.
ही स्पर्धा समाज मंदिर, पंचशीलनगर, कोलगाव इथं सोमवारी दि. १४ एप्रिल २०२५ या दिवशी वेळ : दुपारी ०४.०० ते ०८.०० वेळेत होणार आहे. अधिक माहिती संपर्क
आयु. रविराज जाधव - ७५८८२०४८४७
आयु. रोहित जाधव - ७८२१०३२९१९ (Gpay)
आयु. गौरव जाधव
- ८५३०८८८५८६
UPI ID: rohit9579866998@okhdfcbank
Amount: 60.00