
सावंतवाडी : शहरात बाजारपेठेतील कंटक पाणंद येथे पाणी पुरवठा विभागाकडून दुरूस्तीसाठी मुख्य रस्ते खोदलेले खड्डे पाणी पुरवठा विभागाचे संजय पोईपकर यांचे वारंवार लक्ष वेधूनही बुजवले जात नसल्याने नगरसेवक देव्या सुर्याजी यांनी स्वतः पुढाकार घेत हे खड्डे सिमेंट कॉक्रीटने बुजवून घेतलेत.
नगरसेवक श्री. सुर्याजी म्हणाले, पाणी पुरवठा विभागाकडे व पाणी पुरवठा सभापती यांना याबाबत वारंवार तक्रार करूनही शहरातील रहदारीच्या ठिकाणाचे खड्डे देखील बुजविण्यात आले नाहीत. यामुळे अपघाताला आमंत्रण मिळत असल्याने अखेर सिमेंट कॉक्रीटने हे खड्डे बुजविण्यात आल्याचे श्री. सुर्याजी यांनी सांगितले. तसेच प्रशासनाच्या कारभाराबाबत नाराजी व्यक्त केली आहे.










