सिंधुदुर्ग विभाग ग्रामीण डाक सेवक संघटनेचे रविवारी अधिवेशन !

Edited by: ब्युरो
Published on: March 30, 2024 14:22 PM
views 296  views

सिंधुदुर्ग : अखिल भारतीय ग्रामीण डाक सेवक संघटना, सिंधुदुर्ग विभागाचे अधिवेशन रविवारी 31 मार्चाला होतेय. ओरोस येथील श्री देव रवळनाथ मंदिर सभागृह इथं सकाळी 11 वाजता या अधिवेशनाला सुरुवात होणार आहे.  

या अधिवेशनाला सिंधुदुर्ग विभागाचे डाक अधीक्षक मयुरेश कोलते विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.  तर गोवा क्षेत्रीय विभाग रिजनल सचिव श्रीकृष्ण गाडगीळ, महाराष्ट्र सर्कल अध्यक्ष AIGDSU रायगड काॅ. दिनेश शहापूरकर, सावंतवाडी एच. ओ. पोस्टमास्तर काॅ. संदीप कसबले, मालवण पोस्ट मास्तर काॅ. रवींद्र कोलते हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. या अधिवेशनाला उपस्थित राहण्याचं आवाहन काॅ. संतोष हरयाण आणि सचिव तुकाराम गावडे यांनी केलंय.