केंद्र सरकारच्या निवृत्त कर्मचाऱ्यांचे २२ मार्चला कणकवलीत अधिवेशन !

Edited by: विनायक गांवस
Published on: March 20, 2024 14:42 PM
views 102  views

सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सेंट्रल गव्हर्नमेंट पेन्शनर्स, फॅमिली पेन्शनर्स, पोस्ट, बि. एस्. एन एल रेल्वे, आयकर, सेनादल, ब्यूरो आॅफ माईन्स, शिपिंग, आकाशवाणी, दुरचित्रवाणी, सेंट्रल पोलीस फोर्स, भाभा अॅटोमिक रिसर्च, सेंट्रल एक्साईज आदी केंद्र सरकारच्या खात्यातून निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांचे वार्षिक अधिवेशन शुक्रवारी २२ मार्च रोजी मातोश्री मंगल कार्यालय, कणकवली येथे संपन्न होणार असून या अधिवेशनासाठी एच्. एफ्. चौधरी जनरल सेक्रेटरी पुणे, एस्. बी. सोनार, संघटनमंत्री ठाणे, मुंबई व कोकण, मनोहर पत्की जनरल सेक्रेटरी, मुंबई आदी मान्यवर उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. 

वीस वर्षांपूर्वी सिंधुदुर्ग पेन्शनर्स असोसिएशनचे संस्थापक व प्रमुख सल्लागार एम्. डी जोशी यांनी केंद्र सरकारच्या सेवेतून निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना त्यांचे न्याय्य हक्क मिळवून देण्यासाठी या असोसिएशनची स्थापना केली. या काळात त्यांच्या मार्गदर्शनाखाली शेकडो निवृत्तीधारकानां कोट्यवधी रुपयांचा आर्थिक लाभ मिळवून दिला. असोसिएशनचे स्वतःचे मालवण धुरीवाडा येथे अद्ययावत कार्यालय कार्यरत असून असोसिएशनचे अडीच हजाराहून जास्त सदस्य आहेत. या अधिवेशनात पेन्शनर्सच्या सरकार दरबारी प्रलंबित असणाऱ्या विविध समस्या बाबत उहापोह करण्यात येणार आहे. तरी या अधिवेशनासाठी जिल्ह्यातील असोसिएशनच्या सर्व सभासदांनी उपस्थित रहावे असे आवाहन जिल्हाध्यक्ष श्री डिसोझा, कार्यवाह श्री मोहिते व संघटनमंत्री अॅड नकुल पार्सेकर यांनी केले आहे.