
सिंधुदुर्गनगरी : सामाजिक न्याय व विशेष सहाय्यक विभाग इतर मागास बहुजन कल्याण विभाग स्वतंत्र झाल्याने विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गासाठी राबविण्यात येणाऱ्या योजनेसंदर्भातील पत्रव्यवहार सहाय्यक संचालक, इतर मागस बहुजन कल्याण सिंधुदुर्ग कार्यालयाच्या नावे करावा असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण सिंधुदुर्गाचे सहाय्यक संचालक संतोष चिकणे यांनी केले आहे. सामान्य प्रशासन विभागाच्या अधिसूचनेनुसार व सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडील शासननिर्णयानुसार सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग या प्रवर्गांशी संबंधित पुढील विषय इतर मागास बहुजन कल्याण विभागाकडे वर्ग करण्यात आलेले आहेत.
मराठा आरक्षण,सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग कल्याण,राज्य मागासवर्ग आयोग,इतर मागास वर्ग,विमुक्त जाती,भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्ग यांचे सूचीमध्ये एखादी जात समाविष्ट करणे. सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग,इतर मागास वर्ग,विमुक्त जाती,भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्ग या प्रवर्गाच्या जात विषयक सर्व बाबी, छत्रपती शाहू महाराज संशोधन,प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी). सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग (समाज कल्याण विभागापासून) इतर मागास बहुजन कल्याण विभाग स्वतंत्र झाले असल्याने विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गासाठी राबविण्यात येणाऱ्या योजने संदर्भात जिल्ह्यातील शासकीय, अशासकीय कार्यालये, शाळा, महाविद्यालये,संबंधित कार्यालयीन यंत्रणा,लाभार्थी-नागरिकांनी सहाय्यक संचालक,इतर मागास बहुजन कल्याण,सिंधुदुर्ग कार्यालय या नावाने किंवा vjntobcsbcsindhu@gmail.com या ई-मेल आयडीवर पत्रव्यवहार करण्यात यावे.