
कुडाळ : 'पाणी आडवा, पाणी जिरवा' मोहिमेअंतर्गत पिंगुळी येथील वाघभाटलेवाडी येथे बॅरिस्टर नाथ पै नर्सिंग महाविद्यालयाच्या एनएसएस (NSS) व एनसीसी (NCC) विभागाच्या विद्यार्थ्यांनी श्रमदानातून वनराई बंधारा बांधला. भूजल पातळी वाढवण्यासाठी आणि दुष्काळावर मात करण्यासाठी स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने हा उपक्रम राबवण्यात आला.
या बंधारऱ्यासाठी एनएसएसचे ९ आणि एनसीसीचे १३ विद्यार्थी सहभागी झाले होते. यावेळी महाविद्यालयाच्या प्राध्यापिका भाग्यश्री भोगटे व प्रियांका शिवगण उपस्थित होत्या. या उपक्रमास कुडाळच्या प्रांत अधिकारी ऐश्वर्या काळुशे, नायब तहसीलदार अमरसिंह जाधव आणि बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्थेचे अध्यक्ष उमेश गाळवणकर यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.








