हळबे महाविद्यालयात संविधान दिन साजरा

Edited by: लवू परब
Published on: November 27, 2025 16:37 PM
views 17  views

दोडामार्ग : दोडामार्ग येथील लक्ष्मीबाई सिताराम हळबे कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभाग  यांच्या वतीने संविधान दिवस साजरा करण्यात आला. यावेळी संविधानाचे वाचन करून सर्वांना सरनाम्याची शपथ दिली. यावेळी प्रमुख वक्ते म्हणून घटनेचे अभ्यासक व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर सुभाष सावंत उपस्थित होते.

जगातील क्लिष्ट व मोठी घटना म्हणून भारतीय संविधानाकडे बघितले जाते  भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर  घटना समितीचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद आणि मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संपूर्ण जगातील विविध देशांच्या घटनांचा अभ्यास करून आम्हाला घटना दिली त्यामुळे या आपल्या अधिकाराबरोबरच आपली कर्तव्य ही तेवढीच अत्यंत महत्त्वाची आहे जशी घटना वयाने मोठी होत जाईल तसं त्याचं आणखी महत्त्व वाढत जाईल जगात आपल्याबरोबर स्वतंत्र झालेल्या देशांना अजूनही घटना नाही त्या ठिकाणी हुकूमशाही कार्यरत आहे या हुकूमशाही देशात सर्वसामान्य कोणतेही हक्क मिळत नाहीत. परंतु हेच हक्क आपल्याला घटनेने बहाल केली आहे ज्याप्रमाणे मतदानाचा अधिकार भाषण स्वातंत्र्य असे अनेक भाग आपल्याला घटनेने दिले आहेत. यावेळी अनेक उदाहरणे देऊन त्यांनी घटनेचे महत्त्व सांगितले.       

आजच्या विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त वाचन करून घटनेचा अर्थ समजून घ्यावा. मुलांनी व्यसंगी व्हाव तरच तुम्हाला घटनेचा अर्थ कळणार आहे. तुमचा अधिकार तुमची जबाबदारी यामुळेच तुम्ही देशाचे नाव उज्वल करणार आहात आणि जगात भारत नंबर वन असेल यावेळी त्यांनी घटनेचा अर्थ लावणे या प्रक्रियेवर सुद्धा भाष्य केले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मागास प्रवर्गातील लोकांना मुख्य प्रवास आणले त्यांचे अधिकार त्यांना मिळवून दिले.

मतदानाचा अधिकार किती महत्त्वाचा आहे आपले भविष्य आपल्या हाती आहे. तुम्ही निवडून दिलेला लोकप्रतिनिधी हा निष्कलंक निवडणे हे तुमच्या हातात आहे.

यावेळी व्यासपीठावर प्राचार्य डॉक्टर सुभाष सावंत, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रमाधिकारी डॉक्टर संजय खडपकर, अंतर्गत गुणवत्ता समितीचे प्रमुख प्रा.दिलीप बर्वे, कसई दोडामार्ग नगरपंचायतीचे कर्मचारी, प्राध्यापक, प्राध्यापिकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते. 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉक्टर संजय खडपकर यांनी उद्देश पत्रिकेची शपथ पुष्पलता गावडे हिनी दिली. घटनेवर कुमारी वैष्णवी कदम हिने आपले मत मांडल. सूत्रसंचालन सानिया  गवंडळकर तर आभार प्रीती कांबळे हिने केले.