
कणकवली : कणकवली येथील विजयालक्ष्मी विश्वनाथ दळवी महाविद्यालयात 'भारतीय संविधान दिन' घर घर संविधान या शासन निर्णयानुसार पारंपरिक औचित्य आणि संस्थात्मक शिस्त पाळत अत्यंत उत्साहात संपन्न झाला. हा उपक्रम महाविद्यालयातील करियर कट्टा व एन.एस.एस विभागाच्या वतीने घेण्यात आला.
विद्यार्थ्यांना संविधानातील मूलभूत हक्क आणि कर्तव्ये समजून घेण्यासाठी,प्रोत्साहित करण्यासाठी महाविद्यालयाचे मानद मार्गनिर्देशक विनायक दळवी यांनी विविध उपक्रम महाविद्यालयात सुरु केले.
दीपप्रज्वलन आणि राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. लोकशाही मूल्यांप्रती आपली बांधिलकी जपण्यासाठी सहा.प्रा.प्रशांत हटकर व कु.स्नेहल तळेकर यांनी संविधानाच्या उद्देशिकेचे (Preamble) सामूहिक वाचन करण्यात आले. यानंतर सहा.प्रा.प्रशांत हटकर विद्यार्थ्यांना संविधानाचे महत्व सांगत एक विशेष 'इन्फोग्राफिक व्हिडिओ' दाखवला. तसेच संविधानातील अधिकार आणि कर्तव्ये याची माहिती देण्यात आली. त्या नंतर विद्यार्थ्यांच्या ज्ञानाची चाचपणी करण्यासाठी 'भारतीय संविधान प्रश्नमंजुषा' आयोजित करण्यात आली.
यामध्ये खालील विद्यार्थ्यांनी बाजी मारत विजेतेपद पटकावले:
भाग्यश्री भाई जाधव (एसवाय आय-टी )
लाजरी विजय वातकर (एसवाय आय-टी)
स्नेहल संतोष तळेकर (टीवाय- बिएएफ़)
शेवटी उच्च शिक्षणातील पारंपरिक मूल्यांचा वारसा जपत, बक्षीस वितरण सोहळा पार पडला. महाविद्यालयाचे समन्वयक तथा मुंबई विद्यापीठाच्या सिंधुदुर्ग उप-परिसराचे संचालक श्रीपाद वेलींग यांच्या शुभहस्ते विजेत्यांना बक्षीस देऊन सन्मानित करण्यात आले.
हा उपक्रम विद्यार्थ्यांमध्ये संविधानाची जाणीव आणि राष्ट्राच्या लोकशाही वारशाबद्दल आदर वृद्धिंगत करणारा ठरला. या कार्यक्रमासाठी विद्यार्थ्या सोबत शिक्षक व शिक्षकेत्तर वर्ग उपस्थित होता.











