मतदारसंघातील शिवसैनिक ठाकरे भेटीला 'मातोश्री'वर !

उद्धव ठाकरेंनी दिला शब्द
Edited by: विनायक गावस
Published on: July 15, 2023 20:14 PM
views 218  views

सावंतवाडी : राज्यातील राजकीय परिस्थिती अस्थिर असल्याने सर्वच राजकीय पक्षांनी चाचपणी सुरू केली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या बैठका होत आहे. या पार्श्वभूमीवर सावंतवाडी विधानसभा मतदार संघातील प्रमुख पदाधिकारी मुंबई येथील मातोश्रीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे.

यावेळी खासदार विनायक राऊत, जिल्हा संपर्क अरुण दुधवडकर, जिल्हाप्रमुख संजय पडते, विधानसभा संपर्क शैलेश परब, सावंतवाडी तालुका प्रमुख रुपेश राऊळ, यशवंत परब व संजय गवस, उपजिल्हाप्रमुख बाबुराव धुरी, चंद्रकांत कासार, तालुका संपर्क राजू नाईक, जिल्हा समन्वयक बाळा गावडे, उपजिल्हा संघटक शब्बीर मणियार, युवा सेना गुणाजी गावडे, सागर नाणोस्कर, योगेश नाईक, महिला आघाडीच्या पदाधिकारी मोठ्या संख्येने सर्व सावंतवाडी विधानसभेतील पदाधिकारी उपस्थित होते


जे गेले ते गेले त्याची परवा फिकीर करू नका. तुम्ही कामाला लागा भविष्यात दिवस आपलेच आहेत. जनता आपल्या सोबत आहे. आपली जनतेशी बांधिलकी ठेवा अस उद्धव ठाकरे यांनी सावंतवाडी विधानसभेतील शिवसैनिकांना सांगितलं. तसेच लवकरच कोकणचा दौरा करणार त्यावेळी सावंतवाडी विधानसभेतील सर्व शिवसैनिकाला पदाधिकाऱ्यांना भेटणार चर्चा करणार व जनतेशी संवाद साधणार असा शब्दही त्यांनी दिला.