निवडणुकीच्या काळात मुद्दाम कॉंग्रेसची आर्थिक कोंडी | कॉंग्रेसचं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

Edited by:
Published on: April 02, 2024 09:31 AM
views 136  views

सिंधुदुर्ग : कॉंग्रेस पक्ष हा नोंदणीकृत राष्ट्रीय पक्ष आहे. कोणत्याही नोंदणीकृत पक्षाला आयकरात सूट देण्यात आली आहे असे असताना काहीतरी खोटे कारण दाखवून ऐन निवडणुकीच्या काळात १८२३ कोटींचा दंड ठोठावून तसेच कॉंग्रेस पक्षाची सर्व खाती गोठवून आयकर विभागामार्फत देशातील भाजपा सरकार या देशात निष्पक्ष निवडणुका होऊ नये असा प्रयत्न करत आहेत. हा प्रकार म्हणजे कुस्तीच्या खेळत एका स्पर्धकाचे हात बांधून हात मोकळे असलेल्या स्पर्धकाबरोबर कुस्ती खेळण्यास सांगण्यासारखे आहे. अशा आशयचे निवेदन सिंधुदुर्ग जिल्हा कॉंग्रेसने जिल्हाधिकारी किशोर तावडे यांना दिलं आहे. दरम्यान, देशात निवडणुका निपक्ष होण्यासाठी निवडणूक आयोगाने हस्तक्षेप करावा अशी मागणीही केली आहे.