महायुतीच्या 'त्रिमूर्तीं'चं केसरकरांकडून अभिनंदन !

Edited by:
Published on: November 24, 2024 17:34 PM
views 222  views

सावंतवाडी : महायुतीच्या महाविजयाचे शिल्पकार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांची शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी भेट घेत अभिनंदन केले. राज्यातील नव्या ट्रीपल इंजीन सरकारसाठी त्यांनी यावेळी शुभेच्छा दिल्या. 

महाराष्ट्र महाविजय प्राप्त केल्यानंतर शालेय शिक्षणमंत्री सावंतवाडीचे आमदार दीपक केसरकर यांनी महायुतीच्या नेत्यांची भेट घेत अभिनंदन केलं. राज्यातील ट्रिपल इंजिन सरकारसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्याकडून सलग चौथ्यांदा विजयश्री प्राप्त केलेल्या दीपक केसरकर यांचही अभिनंदन केले.