हळबे कॉलेजमध्ये संगणक साक्षरता कार्यक्रम यशस्वीरीत्या पूर्ण करणाऱ्या ३७ विद्यार्थ्यांचा गौरव

Edited by: संदीप देसाई
Published on: June 22, 2023 19:18 PM
views 77  views

दोडामार्ग : हळबे महाविद्यालयात वेदांत सेसा कोक वझरे आणि वेदांत फाऊंडेशनच्या संयुक्त विद्यमाने संगणक साक्षरता कार्यक्रम  यशस्वीपणे पूर्ण केलेल्या ३७ विद्यार्थ्यांचा नुकताच मान्यवरांच्या उपस्थितीत गौरव करण्यात आला.  

        यावेळी सुर्यकांत परमेकर, सेसा कोक कंपनी प्रमुख बाबाजी पगिरे, प्राचार्य डॉ. सुभाष सावंत, सेसा गोवा आणि वेदांत फाऊंडेशनचे प्रतिनिधी आणि उपस्थित होते. वेदांत संगणक साक्षरता कार्यक्रम हा सामाजिक उपक्रम, जो युवकांना रोजगाराच्या संधींसाठी संगणक प्रशिक्षण प्रदान करतो आणि आजूबाजूच्या विद्यार्थ्यांना डिजिटल शिक्षणाची सुविधा प्रदान करतो. याच उपक्रम अंतर्गत कॉलेज मध्ये संगणक साक्षरता उपक्रम सुरू होता. या अंतर्गत शिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.

वेदांत फाउंडेशन आणि वेदांत सेसा कोक वझरे यांनी विद्यार्थ्यांना आवश्यक संगणक साक्षरता कौशल्ये आत्मसात करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात  सहकार्य केल्याबद्दल प्राचार्य डॉ. सुभाष सावंत यांनी त्यांचे कौतुक केले.