
सावंतवाडी : राजन तेलींच्या प्रचारार्थ उद्धव ठाकरेंची सभा सावंतवाडीत झाली. या सभेत उद्धव ठाकरे म्हणाले, खासदारकीला गडबल झाली अन् आपलं नातं तोडण्याचा प्रयत्न झाला. मतादाना दिवशीही टेबल टाकली गेली होती. त्यामुळे यावेळी सावध रहा. कोकण आणि शिवसेनेच नात वेगळं आहे. आज सगळे एकत्र आलोत. गुंडांच्या हातात कोकण देऊन चालणार नाही हे लक्षात आले आहे. राजन तेली यांना येथील जनता आमदार करणार आहे यात शंका नाही. पण, ज्या केसरकर यांना आम्ही मोठं केलं त्या माणसात श्रद्धा नाही अन् सबुरीही नाही. छत्रपतींचा पुतळा पैसै खाऊन उभा करण्यात आला होता. त्यांना हा पुतळा ईव्हीएमच मशीन वाटलं. मोदी आल्याने भोळा कोकणी माणूस भुलला. पण, हे डाकू आहेत असा टोला मोदींना हाणला. वाईटातून चांगलं होईल अशी विधानं इथले आमदार करतात. यांच्या डोक्यात मेंदू आहे की नाही याची शंका येते. त्यामुळे केसरकर पडल्यानंतरच चांगलं होईल असे मत उद्धव ठाकरेंनी व्यक्त केले.
शेतकऱ्यांच कर्ज मुक्त आम्ही केलं. सरकार आलं की पुन्हा शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेऊ असे श्री. ठाकरे यांनी सांगितले. निवडणूकीनंतर हे कोकण दरोडेखोरांच्या हाती द्यायचं का? हे तुम्हाला ठरवायचे आहे. मला कोणीतरी आव्हान दिलं. मी रस्त्यान येतो अन् रस्त्यानं जातोय. ही माणसं शिवद्रोही आहेत. पुतळा कोसळला तेव्हा काळी कृत्य यांनी केली. दुर्दैवाने यांच घोड गंगेत न्हाले. पण, आता ती चूक होऊ देऊ नका. कोकणात भगवा फडकला पाहिजे. कॉग्रेस, राष्ट्रवादी आमच्यासोबत आहेत.
श काहीजण महाराष्ट्र द्रोह्यांना मदत करण्यासाठी बंडखोरी करत आहेत. त्यांनी पापाचे धनी होऊ नका असे आवाहन त्यांनी केले. लोकसभेला तेली आले असते तर निकाल वेगळा असता. देर हे मगर अंधेर नहीं है..! हाती मशाल असल्याने प्रकाश सोबत आहे. त्यामुळे राजन तेली यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करा असे आवाहन उद्धव ठाकरेंनी केले.