वैभववाडी भाजपा सोशल मीडिया प्रमुख बाबा कोकाटे यांना मातृशोक

Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: April 21, 2023 19:36 PM
views 269  views

वैभववाडी : नाधवडे ब्राह्मणदेववाडी येथील सीताबाई बाळकृष्ण कोकाटे (वय ८०) यांचे वृद्धापकाळानेे निधन झाले. अरविंद सावंत माध्यमिक विद्यालयाचे वरिष्ठ लिपिक आणि वैभववाडी भाजपचे सोशल मीडिया प्रमुख पुरुषोत्तम उर्फ बाबा कोकाटे यांच्या मातोश्री होतं. तसेच माजी सभापती बाप्पी मांजरेकर यांची ती मोठी बहीण. सीताबाई कोकाटे या मनमिळाऊ स्वभावाच्या होत्या. त्यांच्या निधनाने गावात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पक्षात पती, मुलगा, मुलगी, जावई, दिर, ननंद, सूना, नातवंडे, असा मोठा परिवार आहे.