कवी अजय कांडर यांना मातृशोक..!

Edited by:
Published on: January 09, 2024 12:38 PM
views 125  views

कणकवली :  बावशी गावठण येथील रहिवाशी प्रभावती बाळकृष्ण कांडर ( वय - ८५) यांचे मंगळवार ९ जानेवारी रोजी पहाटे दुःखद निधन झाले. त्यांचा अंतविधी आज सायंकाळी ७ वाजता बावशी गावठण येथील स्मशान भूमीत करण्यात येणार आहे. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, दोन सूना, एक विवाहित मुलगी, जावई, नातवंडे, दिर, जावू, पुतणे असा मोठा परिवार आहे. कवी अजय कांडर यांच्या त्या मातोश्री होय.