
सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्गनगरी येथील ज्येष्ठ तसेच दैनिक प्रहारचे पत्रकार बाळ खडपकर यांच्या मातोश्री प्रतिभा विश्वनाथ खडपकर ८७ यांचे आज सोमवारी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास निधन झाले.
त्यांचे पती विश्वनाथ खडपकर हे प्राथमिक शिक्षक होते.श्रीमती प्रतिभा खडपकर यांच्या पश्चात दोन मुलगे,चार मुली,सुना,जावई,नातवंडे असा परिवार आहे.खडपकर हे मूळ देवगड मधील असून १९८१ पासून हे कुटुंब ओरोस फाटा येथे स्थायिक आहे.